विकसित भारतासाठी जसे दर्जेदार रस्ते व महामार्ग आवश्यक आहेत त्याचप्रमाणे समृद्ध ग्रामीण भारतासाठी पाणंद रस्ते महत्वाचे आहेत. शेतकरी बांधवांना आपल्या शेतात जाण्यासाठी व कृषी यंत्र सामग्री सहज वाहून नेता आली पाहिजे यासाठी चांगले पाणंद रस्ते आवश्यक आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पाणंद रस्त्याची अवस्था खराब असून शेतकऱ्यांना शेतीत जाण्यास अडचणी येतात. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आदरणीय देवेन्द्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वात सरकारच्या महसूल विभागाने ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना’ राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या योजने अंतर्गत राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी व शासकीय बांधकामासाठी शेततळी, पाझर तलाव, महसूल नाले व बंधाऱ्यातून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड मोफत मिळणार आहे. यामुळे पाणंद रस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम, दगड व माती शेतकऱ्यांना विनामूल्य व सहज उपलब्ध होईल.
शेतीसाठीची यंत्रसामग्री, शेतमालाची वाहतूक यामुळे अधिक सोयीची होईल. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची कार्यक्षमता वाढेल, उत्पन्न वाढेल व खराब पाणंद रस्त्यामुळे येणाऱ्या अनेक अडचणींपासून सामान्य शेतकऱ्याची मुक्तता होईल.
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की, आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा. चांगल्या पाणंद रस्त्यातून शेती समृद्ध करावी असे राज्याचे महसूल मंत्री यांनी शेतकरयांना निवदेन केले.