आपल्या भाषेचा गोडवा नेहमीच निराळा असतो त्या भाषेच्या गोडव्याची तुलना आपन कोणत्याही भाषेबरोबर करू शकत नाही. मात्र, प्रत्येकाला आपली भाषा ही आवडते आणि यात काहीही चुकीच नाही आणि नक्कीच आम्ही कुणाच्याही भाषेचा द्वेष करत नाही उलट महाराष्ट्रमध्ये संपूर्ण देशातील वेगवेगळया भाषा बोलणारे लोक रोजगारासाठी आणि व्यवसायानिमित्त येतात तर महाराष्ट्र सगळ्यांना आपलासा करतो. तर ह्या दिवसांत ज्या प्रकारे आपली मराठी भाषा आपल्या घरातच पोरकी झाल्यासारखे तिचे हाल होत होते. म्हणजे आज आम्ही मराठी शाळा बंद करण्याचा जो सपाटा लावलेला आहे त्याच्यामुळे अनेको गावा खेड्यातील मुलांच जिवन शिक्षणाविना असेल अस वाटायला लागल होतं.कारण, महाराष्ट्रातील अनेको गावांत आज सुद्धा लोकं, लहान मुलं, मुली, बाया, माणसं, म्हातारे, म्हातार्या, दुकानदार, भाजीवाले, मच्छीवाले , कोंबडीवाले, बकरीवाले, गायीवाले, म्हशीवाले, शेतकरी, गोरगरीब सामान्य माणसे, कामावर जाणारे कामगार, मजूर हे सगळे शाळा शिकलेले असो अथवा नसो, ते आपल्या भाषेतच बहुधा बोलतात आणि त्यांचे सगळे व्यवहार हे त्यांच्या बोलीभाषेतच होतात. तर ह्या दिवसांत ज्या प्रकारे मराठी शाळा बंद होण्याचा सपाटा लागला होता ते अतिशय भयंकर होतं आणि आहे. कारण त्यांच्या कितीतरी पिढ्या त्याच भाषेत बोलत आलेल्या आहेत आणि आता सुद्धा सभोवताली आणि आपल्या समाजात वावरताना ते त्याच भाषेत बोलतात आणि ही बाब आश्चर्यकारक मुळीच नाही आहे. मात्र काही वर्षापासुन ज्या प्रकारे आपल्या भाषेचा दर्जा घसरवण्याचा जो काही प्रकार सुरू होता आणि आणि आहे त्यामुळे अस वाटायला लागल होतं की,
जर राज्यातील सगळ्या खेडे गांवात सगळ्या मराठी शाळा बंद केल्या गेल्या आणि तिथे इंग्रजी शाळा सुरू केल्या गेल्या तर येणार्या काही वर्षात आपली भाषा फक्त इतिहासात जमा असेल आणि त्या अनेको मुलांचे आणि लोकांचे हाल वाईट असेल ज्यांना आपल्या भाषाच शिकायला आणि बोलायला मिळत नाही . जर अश्या प्रकारे आपली भाषा आपल्या लोकांकडून नाकारल्या गेली तर
मराठी भाषा अस्तित्वात होती अस येणार्या पुढच्या पिढ्या ते त्यांच्या शाळेतील त्यांचा भाषेचा किंवा इतिहासाच्या पुस्तकात कधीतरी वाचले असते.
तर आज ज्या प्रकारे आणि ज्या वेगाने मराठी भाषेला खाली ओढण्याच काम सुरू आहे ते कदाचित आपल्याच निष्काळजीपणामुळे किंवा तिला दुर्लक्षित करण्यामुळे किंवा आपल्या भाषेला बाकीच्या भाषांहून दुय्यम समजल्यामुळे कदाचित असू शकेल.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हि बाब प्रत्येकासाठी आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. कारण, मराठीचा गोडवा आम्हाला आमच्या मराठी गाण्यांतून, मराठी कवितांतून, आमच्या मराठी अभंगातून ,मराठी नाटकांतून, चित्रपटांतून आणि प्राचीन साहित्यातून आम्हाला आता सुद्धा वाचायला, बघायला आणि अनुभवायला मिळतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेकांना मराठी भाषा शिकण्यास प्रेरणा मिळेल आणि मराठी भाषेला फुलोरा आलेला आपणाला भविष्यत दिसेल. त्याचबरोबर आपल्या मराठी भाषेचा आणि साहित्याचा जगभरात प्रसार होण्यास मदत होईल आणि ही अतिशय सुंदर बाब आहे. सर्वानी मराठी शिकावी आणि जे बाहेरून जे लोक येतात आणि इथे स्थिरावतात त्यांनी सुद्धा आनंदने आणि उत्साहाने त्या त्या राज्याची मातृभाषा शिकण्याचा प्रयत्न करवा. मराठी माणसे खूप जिज्ञासु आणि चिकित्सक असतात नव नवीन गोष्टी ते लवकर शिकून घेतात आणि भाषा सुद्धा; त्यामुळे आमच्या लोकांना आमच्या फक्त आजूबाजूच्या राज्यातील लोकांच्याच भाषा अवगत नसतात तर ते इंग्रजी सुद्धा बर्या पैकी समजतात आणि बोलतात आणि ते कुणाच्याही भाषेचा तिरस्कार करत नाही, कारण आमच्या इकडे मराठी भाषे सोबतच बाकीच्या भाषांना सुद्धा आदराने बघितल्या जाते.
तर शेवटी मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे, मोदीजी च्या भाजपा सरकार ने हा निर्णय मराठी सोबतच बंगाली, असामी आणि पाली, प्राकृत ह्या भाषांना अभिजात भाषांच्या दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे मोदीजींचे खूप खूप आभार. कारण कदाचित कॉँग्रेस सरकार अश्या प्रकारचा निर्णय घेण्यास आणखी किती वर्षे लावले असते कुणास ठाऊक?