भूक आणि गरीबी विरुद्ध लढा’ हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि या क्षेत्रातील आंम्ही शाश्वत प्रगतीसाठी मोठे योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत .
जेणेकरून गरिबी आणि उपासमारीचे प्रश्न जे भारतात लोकांना भेडसावत आहे ते आम्ही सोडवू शकू . त्याचबरोबर आम्ही २५० दशलक्ष लोकांना गरिबीच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करत आहोत.
भारत ८०० दशलक्ष लोकांना मोफत रेशन पुरवत आहे , जेणेकरून आम्ही त्या प्रकारे लोकांचे उपासमारीचे आणि भुकेचे प्रश्न सोडवू शकू. गरीब आणि वृद्धांसाठी उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्य सेवा, महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी पावले उचलणे आणि अन्न तसेच पौष्टिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ब्राजील मध्ये झालेल्या G२० शिखर परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखर परिषदेमध्ये भारताची बाजू मांडली.
भारताचा ‘बॅक टू बेसिक्स’ आणि ‘मार्च टू फ्युचर’ या दृष्टिकोनांवर विश्वास आहे. म्हणूनच आम्ही सेंद्रिय शेतीवर भर देत आहोत, बाजरी (भारतात श्री अण्ण म्हणून ओळखली जाते) ती आम्ही लोकप्रिय करत आहोत आणि हवामानाला अनुकूल असलेल्या पिकांना आम्ही प्रोत्साहन देत आहोत.