जे लोक वर्षोनुवर्षे आपली पिळवणूक करत आलेत. जे लोक आपल्याला सातत्याने विभागन्याचा प्रयत्न करतात तरी,आम्ही त्यांचा सोबत. त्यांच्या सोबत अनेको वर्षे चालून सुद्धा आमच्या सामाजिक परिस्थिति मध्ये काहीही फरक पडला नाही तरीही आम्ही त्या लोकांना साथ देतो, यामुळे नुकसान कोणाच होणार आहे. ना तुमच्या पायात चपला, ना घरात स्वयंपाकासाठी रॉकेल, ना घरात कंदील लावण्यासाठी रॉकेल, मूलं तुमची उपाशी झोपतात. कुपोषणामुळे मृत्यूला कवटाळत आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. गावात सुधारना करण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत. गावात सरकारी दाखवणे आणण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत. एखाद असेल दवाखाना तर तिथे डॉक्टरांसोबत सगळेच गायब असतात, फक्त चपराशी तेवढा त्या इस्पितळाची रखवाली करण्यासाठी फाटकाजवळ उभा दिसतो. बीमार रुग्ण दररोज चकरा मारून तिथून वापस जात असतात अशी परिस्थिती असते. अनेक रुग्ण गावातल्या गावात योग्य उपचार न मिळाल्यामुळे दगावतात. तरी तिथल्या तुमच्या प्रशासनाला जाग येत नाही ना तिथल्या तुमच्या पुढाऱ्याला तुमच्या समस्या गंभीर वाटत आणि अनेको वर्षे पालटून सुद्धा आणि आता सुद्धा आम्हाला त्या समस्या तश्याच दिसतात. तुमच्या गावातील रस्त्यांवर ना विजेचे खांब दिसत आणि दिसले तरी तिथे चिमणी पाखरे बसलेली दिसतात किंवा मग त्यावर पतंगा लटकलेल्या दिसतात, मात्र उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आणि रात्रीच्या समयी ये जा करणार्या लोकांसाठी तिथि रात्रदिवे जळताना दिसत नाहीत. गावातील स्त्रिया, मूल, मुली, म्हातारी कोतारी उघड्यावर किंवा रस्त्याच्या बाजूला शौचास बसताना दिसतात. मात्र आम्ही या बद्दल ओरडत नाही की, का आम्हाला आमच्या गावात सार्वजनिक शौचालये बांधुन दिल्या जात नाहीत. ना गावातील हॉस्पिटल्समध्ये कर्मचारी उपलब्ध असतात ना डॉक्टर दिसत आणि शाळांचा प्रश्न तर गंभीर आणि सरकारी शाळा बंद होत जाण्यामुळे गावा खेड्यातील लोकांपुढे किती मोठा प्रश्ण निर्माण होतो, की आता आमची मुलं, मुली कशे शिकणार पुढे आणि एखादी सरकारी शाळा असेल तरी ती सुद्धा दुसर्या गावात अस का? आता ही लहान, लहानशी मूलं पावसाळय़ात आणि हिवाळ्यात आपल गाव ओलांडून ज्या गावात शाळा असेल तिथे जाणार? इथे मात्र आम्ही लोकांनी आपल्या सरकारला प्रश्न विचारायला हवा. फक्त विकास करतो म्हंटल्या ने कस होईल? अनेको वर्षे उलटून गेली मात्र आमची परिस्थिती मात्र बदलत नाही आणि तिकडे निवडणूकीच्या तोंडावर पैशावर पैसा ओतला जातो. फक्त आणि फक्त सामान्य आणि गोर गरीब लोकांना आणि दलालांना विकत घेण्यासाठी. मोठ मोठ्या नेत्यांच्या सभा होतात या दिवसांत आपल्या वेगवेगळया गावांत . आपल्याला खूप आनंद होतो की दिल्लीवरून भाषण ठोकायसाठी आपल्या छोट्याश्या गावात कुणीतरी पुढारी आलाय. आमचा अख्खा गाव तिथे त्याचा सभेत जमा होतो. लोकांना काय काय अपेक्षा असतात. बायकांना काय काय अपेक्षा असतात. असतात की नाही? असतात ना? आता एवढा मोठा पुढारी आमच्या गावच्या बबल्या ने आणला म्हणजे जर का याला निवडून दिला तर आमच्या गावाचा कायापालट होणार ही अपेक्षा आम्हा सर्वांना असते. गावातील लोकांना, पुढारी आला की, तो सरबत पाजतो, कोला, कोकाकोला पाजतो, पुढारी ही जोरदार भाषण ठोकतो आणि म्हणतो की तुम्ही लोकांनो चिंता करू नका तुमचे प्रश्ण आम्ही सोडवून टाकू फक्त तुम्ही आम्हाला एकदा निवडून द्या आणि आम्ही आमची मतं धडाधड त्या पक्षाच्या चिन्हावर टाकतो पुढारी निवडून येतो आणि मात्र हळूहळू दिवस पालटत जातात. गावातील प्रश्न जसेच्या तसेच दिसतात, पुढारी सुद्धा गावात फिरकेनासे होतात आणि संपूर्ण काळ उलटून जातो मात्र बदल मात्र गावात होत नाही. परत एकदा लोकांना पुढारी मूर्ख बनवुन जातात ते बक्कळ श्रीमंत होतात आणि आम्ही तिथच्या तिथेच, दररोज रस्त्याच्या दुतर्फा आताही शौचास बसत जातो!