भारत हा एक सुंदर देश आहे जिथे दरवर्षी हिवाळ्यात आणि पावसाळ्यात भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात मोठ्या संख्येने विविध प्रकारचे पक्षी भेट देतात.
केवळ पक्षीच नाही तर विविध देशांमधून दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भारतात आणि भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये येतात आणि इथल्या वातावरणाचा इथल्या, निसर्गाचा इथल्या अनेक खाद्यपदार्थांची सुद्धा मस्त पैकी चव घेऊन जातात.
भारतातील प्रत्येक राज्यात पर्यटकांना त्या प्रदेशाची विविध संस्कृती आणि जमिनीवरील या लोकांचे जीवन पाहायला मिळते.
इथल्या स्थानिक लोकांना आदरातिथ्य करायला आवडते आणि ते पर्यटकांच अतिशय सौहार्दपूर्ण आणि प्रामाणिकपणे स्वागत करतात.
भारत या काळात जगातील लोकांना त्याच्या संस्कृतीमुळे, त्याच्या इतिहासामुळे, देशाच्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रदेशात लोकांना दिसणाऱ्या पर्यटन स्थळांमुळे प्रचंड आकर्षित करत आहे.
लोकं हळूहळू VOCAL FOR LOCAL या मंत्रावर विश्वास ठेवत आहेत जेणेकरून ते त्यांच्या देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देऊ शकतील.
आणि आजकाल आपल्या भारतीय बाजारपेठा वेगवेगळ्या देशांतील लोकांना, व्यापाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असल्याचे दिसून येते आणि म्हणूनच आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या क्षेत्रांमध्ये चांगल्या संधी मिळत आहेत हे पाहायला मिळते. त्यामुळे आपल्या समाजात आणि देशात अशा अद्भुत गोष्टी घडताना आणि बदलताना आपल्याला पाहायला मिळतात.






