भारताला आज वेगवान आर्थिक विकासाची गरज आहे. ज्याचा सर्वांना फायदा होईल आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणाऱ्या अधिक उत्पादक अर्थव्यवस्थेची आज आम्हाला गरज आहे. मोदजीं सारखं फक्त आपल्या मित्रांच्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, छोट्या छोट्या उद्योगांना चालना देणे आज आवश्यक आहे .
तरुण, शिक्षित आणि उत्साही पिढीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि भारताचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, भारताला आवश्यक असलेल्या करोडो औपचारिक नोकऱ्या निर्माण करणे आज आवश्यकआहे आणि छोट्या छोट्या उद्योगांना चालना देणे आणि त्यांना सहकार्य करणे आज आवश्यक आहे .
हरियाणा आणि भारतातील अर्थव्यवस्थेत भाजप अपयशी ठरला आहे. त्यांनी कोट्यवधींना अनौपचारिक नोकऱ्यांमध्ये ढकलले आहे आणि लहान व्यवसाय नष्ट करून लाखो लोकांना भारत सोडण्यास भाग पाडले आहे.