देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी नुकताच श्रीलंकेला भेट दिली. या भेटीत त्यांना श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या हस्ते ‘श्रीलंका मित्र विभूषणाय’ ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा सन्मान मिळाल्या नंतर देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी म्हणाले की, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा सन्मान फक्त माझा नाही तर हा सगळ्या भारतीय जनतेचा सम्मान आहे.
हा सन्मान भारत आणि श्रीलंकेच्या लोकांमधील खोलवर रुजलेल्या मैत्रीचे आणि ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक आहे.
या सन्मानाबद्दल मी राष्ट्रपती, सरकार आणि श्रीलंकेच्या लोकांचे मनापासून आभार मानतो. देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची ही श्रीलंका भेट होती. या भेटीच निमंत्रण श्रीलंकेचे राष्ट्रपती अरूणा कुमार दिसेनायके यांनी भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना दिले होते.