नुकताच काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष ,उत्तर प्रदेश चे नेते आणि खासदार अखिलेश यादव यांनी शिक्षक समुदायाला पत्र लिहून आपल्या भावना शिक्षणाप्रती व्यक्त केल्या. त्या पत्रात ते म्हणाले कि मला मी शिक्षकाचा मुलगा असल्या मुळे माझे शिक्षकांशी कौटुंबिक नाते आहेत. त्यांचे दुःख माझे दुःख आहे. या दिवसांत शासनाचा शाळा विलीनीकरणाचा प्रयोग सुरु झाला आहे आणि या मुळे मला चिंता वाटते .
कारण गावा खेड्यळातील शाळा विलीनीकरणामुळे शिक्षकांची संख्या आणखी कमी होत जाईल. गावांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा अभाव आणि असुरक्षिततेमुळे, शाळा विलीनीकरणानंतर मुली ह्या दूर असलेल्या शाळांमध्ये जाऊ शकणार नाही त्याच बरोबर त्यांचे आई, वडील सुद्द्धा मुलींना दूरच्या शाळांमध्ये पाठवण्यास घाबरतील. यामुळे मुळींच शिक्षणाचं प्रमाण हे घटेल, लोकं त्यांच्या मुलांना शाळेतून काढून टाकतील परंतु या सर्व गोष्टी फक्त कुटुंबातील एक सदस्यच समजू शकतात.
आम्ही नेहमीच शिक्षक संघटनेच्या मागण्यांना पाठिंबा देत आलो आहोत आणि देत राहू.
मूलभूत शिक्षक भरती प्रयागराज आंदोलकांना आमचा पाठिंबा कायम राहील.
आम्ही ६९००० सहाय्यक शिक्षक भरती आंदोलकांच्या हक्कांसाठी लढत राहू.
शिक्षा मित्र आंदोलकांना नेहमीच आमचा पाठिंबा राहिला आहे आणि पुढे सुद्धा आमचा पाठिंबा त्यांना मिळत राहील .
शिक्षक आणि मुलांचे पालक जितक्या लवकर समजतील की भाजप सरकार शिक्षक आणि शिक्षणाच्या विरोधात आहे आणि भाजपमुळे कुटुंबातील मुलांचे भविष्य अंधारात आहे, तितक्या लवकर बदलासाठी जमीन तयार होईल असं सुद्धा ते पुढे म्हणाले.
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले कि भाजप रूढीवादी आहे आणि त्यांना माहिती आहे की एक सुशिक्षित व्यक्ती प्रश्न उपस्थित करते, तो फुटीर राजकारणाला विरोध करतो, म्हणूनच शाळा जितक्या कमी असतील तितका भाजपचा विरोध कमी होईल असं त्यांना वाटत . सुशिक्षित नोकऱ्या मागतील. जर सरकारी नोकऱ्या असतील तर आरक्षणही द्यावे लागेल. म्हणूनच आरक्षणाविरुद्ध असलेल्या भाजपच्या अजेंड्यात आज नोकऱ्या नाहीत ह्या प्रकारे त्यांनी भाजप सरकारवर आगपाखड केली.
भाजप चा नेहमीच शिक्षकांच्या समस्यांबद्दल उदासीनतेचा दृष्टिकोन ठेवत राहिलेला आहे. अश्या प्रकारे शिक्षकांना संबोधून लिहलेल्या पत्रात त्यांनी आपल्या भावना भाजप सरकार बद्दल मांडल्या .