गाईंना राज्यसरकारने नुकताच राज्य गोमातेच्या दर्जा दिला . यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार वर आपल्या सोशल मीडिया हॅन्डल वरून ताशेरे ओढले.
ते म्हणाले कि आमच्या राज्यात गुरांची परिस्थिती दर वर्षीच वाईट असते त्यामुळे दुष्काळात चारा पाणी नसताना चारा छावण्या मार्च मध्ये सुरु करण्याऐवजी पावसाळा सुरु झाल्यानंतर जूनमध्ये सुरु केल्या तेव्हा राज्यसरकारला गोमाता आठवली नाही का?
दुधाला चांगला दर देण्यासाठी तसेच दुध अनुदानसाठी जाचक अटी टाकताना गोमाता आठवली नाही का?
आणि सद्यस्थितीला पश्चिम महाराष्ट्रात लम्पी आजाराने डोके वर काढले आणि त्यामुळे गुरांची परिस्थिती अनेक ठिकाणी चिंताजनक असते. तर यांच्या उपचारासाठी कित्येकदा शेतकऱ्यांना आणि ज्यांच्या कडे गाई असतात मात्र योग्य उपचार न मिळाल्या मुळे त्यांच्या गाई दगावतात तर हि परिस्थिती अनेको गावांमध्ये आमच्या महाराष्ट्राच्या निर्माण झाली त्यावेळी आमचं सरकार कुठं होत त्यावेळी आमच्या सरकारला गोमातेची का आठवण आली नाही?
परंतु आज निवडणूक येताच शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत भावना जागृत होऊन गोमातेला राज्यमाता घोषित करण्याचा साक्षात्कार होणाऱ्या या सरकारच्या भावना गोमाता अडचणीत असताना कुठे जातात ?
खऱ्या भावना असत्या तर पशुधन अडचणीत असताना मदत केली असती, असो पुतना मावशीचे हे खोटारडे प्रेम दाखवणाऱ्या या खोटारड्या सरकारला महाराष्ट्र चांगलंच ओळखून आहे अश्या प्रकारे त्यांनी राज्य सरकार वर ताशेरे ओढले.