नरेंद्र मोदींबद्दल द्वेष दाखवण्याची एकही संधी काँग्रेसचे नेतृत्व कधीही गमावत नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांचे हे भाषण हे असेच एक उदाहरण आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत.
त्यांनी विकसित भारत पाहावा अशी आमची इच्छा आहे जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत, जम्मू काश्मीर मध्ये प्रचाराच्या दरम्यान काँग्रेस चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका सभेत मोदीजींना उद्देशून म्हंटल होत कि, जो पर्यंत आम्ही मोदजींना पंतप्रधानपदावरण हटवणार नाही तोपर्यंत मी सुद्धा मरणार नाही ,
जरी माझं वय हे आज ८३ वर्षे झाले असले तरी मी अजूनही देशाची आणि लोकांची सेवा करू शकतो आणि जो पर्यंत मोदीजींना आम्ही हटवणार नाही तोपयर्यंत मी सुद्धा मरणार नाही असं ते त्यांचा भाषणादरम्यान म्हणाले होते, मात्र त्या नंतर त्यांना भोवळ आली वे ते पुढचं भाषण करू शकले नाही. मात्र काही वेळानी त्यांनी परत बसून भाषण केलं होत. खर्गेंची प्रकृती बिघडल्याची जेव्हा बातमी मिळाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची फोन करून प्रकृती स्वास्थ्यची विचारपूस केली होती.
मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांना मल्लिकार्जुन खर्जेची मोदींवरली टीका चांगलीच झोम्बली होती आणि त्यामुळे त्यांनी प्रसारमाह्द्यमांवर आपल्या प्रतिक्रिया ह्या दिल्या होत्या आणि प्रकृती स्वास्थ्यबद्दल काळजी घेण्याचे सल्ल्ले सुद्धा त्यांना देण्यात आले आणि त्याच प्रकारे अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खर्गे यांचा त्या विधानावर त्यान्च्या फेसबुक हॅन्डल वर व्यक्त केली होती .