निराधार जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभागाकडून काही समाजउपयोगी योजना राबविण्यात येत आहेत.
त्यामध्ये, जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना , जेष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम योजना. त्याचसोबत जेष्ठ नागरिकांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना. तर ज्या लोकांच वय हे ६० वर्षांहून अधिक आहे त्या जेष्ठ नागरिकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यात सवलत देणे.
मुख्यतः ज्या जेष्ठ नागरिकांचं वय हे ६५ वर्षाच्या वर आहे त्यांना हि सवलत राज्य परिवहन मंडळाच्या बस मध्ये प्रवास करताना देण्यात येणार आहे.
त्याच बरोबर महाराष्ट्र शासनाकडून जेष्ठ नागरिकांसाठी श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजना सुद्धा राबवण्यात येत आहे आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना सुद्धा राबवणायत येत आहे.
त्यामुळे जे जेष्ठ नागरिक, ज्यांचं वय ६० वर्षाहून अधिक आहे आणि जे निराधार आहेत त्यांनी या योजनांचा अधिकाधिक प्रमाणात लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेस साह्यता विभाच्या वेबसाइट ला भेट द्यावी .