आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात वेगवेगळया राज्यातील अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात आणि बर्या पैकी विकले सुद्धा जातात. समोसे , कचोरी , जलेबी , ढोकळा , सांबर वडा , डोसा , वेगवेगळ्या मिठाई मधले वेगवेगळे प्रकार त्यांना आवडतात आणि अन्नपदार्थ सुद्धा.
आपल्याकडील लोकांना त्यामुळे जे जे उत्तम खाद्यपदार्थ आहे ते खाण्याची हौस असते आणि सर्वाना ते आवडतात सुद्धा आणि प्रचंड प्रमाणात त्या गोष्टी आपल्याकडे मिळत असल्यामुळे
आपल्याला बघायला मिळते की लोकं या गोष्टींसाठी दूर दुरून हे खाद्यपदार्थ खाण्यासाठी येत आहे. त्यात काही वाईट नाही!
आपल्याकडे सुद्धा बरेच स्थानिक पदार्थ हे लोकप्रिय आहेत आणि लोकांना ते खायला सुद्धा आवडतात आणि बाकीचे सुद्धा अनेक वेगवेगळे खाद्यपदार्थ त्याचसोबत चाखण्याचा आनंद लोक घेतात .
आणि स्त्रियांकडुन किंवा खाद्यपदार्थ बनवणाऱ्या लोकांकडून त्या बद्दल बोलल जात त्यामुळे ज्यांना खाद्यपदार्थाबद्दल बोलायला आवडत त्यांनी आपल्याला माहित असेलेल्या आणि आवडणाऱ्या खाद्यपदार्थांबद्दल बोलावसं वाटत
किंवा या बद्दल माहिती त्या लोकांनी चारचौघात मांडली तर लोकांना तेवढीच अधिक ओळख या खाद्यपदार्थबद्दल होईल आणि बाकीच्यांना सुद्धा त्यातून शिकण्यास मदत होईल , प्रेरणा मिळेल आणि तुमच्या बनवलेल्या गोष्टी वाचण्याचा आनंद लोकांना घेता येईल!
तर अश्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्याची आवड असणार्या लोकांना आणि त्यांना त्यांचा खाद्यपदार्थाबद्दल बोलायला आवडत त्यांच्या करिता इथे
आपल्याकडे खास पान आहे तिथे त्यांचे खाद्यपदार्थां बद्दल चे अनुभव आणि ते कश्या प्रकारे शिकले वा बनवतात या बद्दल ते आपल्या सगळ्या गोष्टी “खवय्येगिरी” या पानावरून मांडू शकतात!
त्यांचा खाद्यपदार्थांबद्दल चे लेख या पानावर छापल्या जातील.







