टाटा एरबस हा विमान निर्मितीचा प्रकल्प पूर्वी महाराष्ट्रात होणार होता, तो प्रकल्प महाराष्ट्रातून हटवून त्याला गुजरात येथे नेण्यात आले असं काँग्रेस नेते आणि काँग्रेस चे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले त्यांनी आपल्या सोसिल मीडिया हॅण्डलवरून महायुती वर ताशेरे ओढले ते म्हणाले कि महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीचं अग्रेसर डेस्टिनेशन, ही ओळख भ्रष्ट युतीने पुसून टाकली आहे.
दिल्ली दरबाराची हुजरेगिरी करणा-या गुजरात धार्जिण्या भ्रष्ट युतीने, कायमच महाराष्ट्रापेक्षा गुजरातचं हित कसं साधलं जाईल याचाच विचार करतं.
एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होणार होता. मात्र भ्रष्टयुतीच्या हलगर्जीपणामुळे तो गुजरातला गेला.
या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर, भंडारा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांसाठी किमान 10,000 रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असत्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर मधून येतात, पण दिल्लीश्वरांपुढे नागपूरकरांच्या हक्काचंही त्यांना मिळवून देता आलेलं नाही. ते महाराष्ट्रातील तरूणांना काय न्याय देणार?