जमाना वेगळा आहे. वेगवेगळया देशातील विमाने, जहाजे आज आपल्या देशात येतात. आपल्या देशातील विमाने वेगवेगळया देशात उतरतात.
वेगवेगळया देशातील लोक आपल्या देशात येतात आणि आपल्या देशातील लोक वेगवेगळ्या देशात येत जात राहतात व्यापारासाठी, कामासाठी आणि फिरायला सुद्धा.
वेगवेगळया देशातील लोक जेव्हा आपल्या देशात येतात ते तिथली संस्कृती, भाषा, खान पान या तिथल्या जगातल्या गोष्टी सुद्धा नकळत पणे आपल्याला सांगून जातात आणि आपल्या देशातील लोकं जेव्हा वेगवेगळय़ा देशात जातात तेव्हा आपली संस्कृती, आपली भाषा, आपले खान पान आपले पेहराव याची माहिती आपन नकळत पणे त्या देशात देऊन येत असतो.
वेगवेगळया देशात आज तरुण शिकायला जातात आणि वेगवेगळया देशातील तरुण आपल्याकडे सुद्धा शिकायला येतात.
कॉम्पुटर, स्मार्टफोन, AI, वेगवेगळी आधुनिक प्रकारची वाहणे आपल्याला चालवायला मिळतात आणि वेगळया देशातील वाहने, फोन, कपड़े, वस्तु आपल्या बाजारात येतात आणि आपल्या कडील वस्तू आणि गोष्टी वेगवेगळय़ा देशात आणि बाजारात जातात.
शाळेत, महाविद्यालयांत, खाजगी क्षेत्रात, सरकारी कार्यालयात, रेल्वे स्थानकावर, बस स्थानकांवर सगळीकडे आज लोकं सोबत जातात आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा मिळून मिसळून काम करतात.
म्हणजे आज सोबत चालण्याचा काळ आहे, मिळून मिसळून जेव्हा समोर जात असाल तरच लोकांची प्रगती आणि समाजाची प्रगती होताना आपल्याला बघायला मिळेल.







