या दिवसांत रस्त्याच्या दुतर्फा जर का झाडे असेल तर ती झाडे! पूर्वी ज्या प्रकारे दिसायची हिरवीगार आणि टवटवीत तशी दिसत नाहीत.
अनेक शहरात ही समस्या असते. शहराच्या बहुतांश भागात रस्त्याचा कडेला झाडे ही नसतात आणि असली तर ती धुळीने माखलेली दिसतात.
कारण जमिनीची धूप या दिवसांत प्रचंड प्रमाणात होताना दिसते. जरी रस्ते बनलेले असले तरी आजूबाजूला माती ही अगदी वाळलेली असते.
त्या माती मध्ये ओलावा नसतो आणि त्यामुळे ती माती जेव्हा गाड्या भराभर तिथून जात असतात त्या दरम्यान ती अगदी सुकलेली माती जाणार्या प्रत्येक गाडी सोबत हवेत उडत असते.
आणि ती उडणारी धूळ आजूबाजूला असलेल्या त्या काही झाडांवर अलगदपणे स्थिरावतांना दिसते.
त्यामुळे दररोज जमा होणारी ती धूळ त्या झाडांच्या पानांवर, त्या झाडांना अगदी निस्तेज बनवून टाकतात. कोणतही पान तिथल तजेलदार अथवा टवटवीत दिसत नाही. सगळ्याच झाडांवर प्रचंड धूळ जमा झालेली आहे अस दृश्य आपल्याला बघायला मिळते.
या वरुण आपल्याला परिस्थिती कळते की किती वेगात जमिनीची झिज ही होत आहे.
रस्ते जरी कुठे कुठे चांगले असले तरी तिथे प्रदूषणामुळे लोकांना तोंडाला दुपट्टे किंवा मग रुमाली बांधुन प्रवास करावा लागतो. तर या दिवसांत कश्या प्रकारे, मातीची होणारी झिज ही थांबवता येईल आणि रस्त्यावर जे दिसणार धुळीच साम्राज्य कशाप्रकारे कमी करता येईल यावर काम करणे आवश्यक आहे.
कारण, हवेमध्ये उडणारी धूळ अनेकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. अनेकांना त्या मुळे श्वसनाचे आणि त्वचेचे रोग होतात .
लोकांना अधिक प्रमाणात जर का रस्त्यावर धूळ उडत असेल तर वाहने चालवणे कठीण होऊन जात.
त्यामुळे आज मातीची होणारी झिज ही कशाप्रकारे थांबवता येईल यावर प्रामाणिकपणे काम होणे आणि रस्ते प्रदुषणविरहित होणे आज आवश्यक आहे.







