अनेक गुंतवणूकदारांची रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर बारीक नजर असते. त्यांच्या पोर्टफोलिओतील एका शेअरने उत्तुंग भरारी घेतली आहे. या स्टॉकने यापूर्वी चौपट परतावा दिला होता. आता हा स्टॉक पुन्हा धावला आहे. रेखा झुनझुनावाला यांच्या पोर्टफोलिओतील कंपनी NCC ने गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. 13 मे 2022 रोजी एनसीसीचा शेअर 62.1 रुपये प्रति शेअरवर बंद झाला होता. तो आज 273 रुपये प्रति शेअरवर पोहचला आहे. या कालावधीत NCC कंपनीच्या शेअरने 339 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. तर हा स्टॉक BSE 500 Index या कालावधीत केवळ 51.69 टक्क्यांनी उसळला आहे.