आपल्याकडे मुख्यतः उन्हाळ्यात गायींना सगळीकडे हिरव गवत मिळत नाही आणि आपल्याला बघायला मिळते की गाई फक्त थोड्याशा हिरव्या चाऱ्यासाठी संपूर्ण गावात फिरतांना दिसतात मात्र संपूर्ण गावात फिरल्यानंतर सुद्धा त्यांना खायला गवत मिळत नाही आणि कित्येकदा उन्हाळ्यात त्यांना झाडांची सावली मिळण्यासाठी खूप फिराव लागत कारण आज आपल्याला कुठेही झाडे दिसत नाहीत सगळीकडे आज इमारतीच, इमारती दिसतात आणि त्यामुळे पायी चालवणार्यांच नाही तर पक्ष्यांना, प्राण्यांना आणि गायींनाही खूप त्रास सहन करावा लागतो. शेतकऱ्यांकडे त्यांच्या गायींसाठी उन्हाळ्यात पुरेसा साठवलेला चारा नसल्यामुळे ते त्यांच्या गायींना उन्हाळ्यात गावात फिरण्यासाठी मोकळे सोडतात आणि त्या गवताच्या शोधात सर्वत्र फिरताना दिसतात. मात्र इथे लोकांना खूप दूरवर चालून सुद्धा एखाद झाड मिळत नाही सावलीत उभ राहण्यासाठी तर गुरांची परिस्थिती काय असेल याची आपण कल्पना करू शकतो; आणि गायींकडून आपल्याला खूप काही मिळते. पण भारतात आपण बघतो की लोकं आपल्या गायींची काळजी घेत नाहीत आणि आपण त्या सर्वांना वणवण भटकण्यासाठी सोडून देतो आणि त्यांना राहण्यासाठी गोठ्यांचा सुद्धा बंदोबस्त करत नाही आणि त्यांची काळजी घेण्यात लोक टाळाटाळ करत असल्याचे आपल्याला आढळून येते ही निश्चितच एक गंभीर बाब आहे. उन्हाळ्यात अनेक गाईचा मृत्यू फक्त निष्काळजीपणामुळे होतो आणि नंतर गायी नसल्यामुळे अनेक शेतकरी जे आधीच त्यांच्या आयुष्यात असंख्य समस्यांमुळे त्रस्त आहेत ते अधिक संकटात सापडतात. जर त्यांच्या गायी त्यांना दररोज दूध देत असतील आणि ते दूध जर ते जवळच्या डेअरीमध्ये विकत असतील तर ते कसे तरी त्यांचे कुटुंब चालवू शकतात परंतु त्यांची काळजी न घेता, त्यांना निवारा न देता, त्यांना अन्न न देता आणि त्यांना अपन कडक उन्हात वणवण फिरण्यासाठी सोडून देतो आणि त्यामुळे आपण आपल्या गायी गमावू शकतो. विशेषतः उन्हाळ्यात त्यांच्या चाऱ्याचा योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे जेणेकरून आपण आपल्या गायींना वाचवू शकू आणि आजकाल आपल्याला गायी मोफत मिळतात का? नक्कीच नाही. आणि मी अनेक वेळा भारतीय शेतकऱ्यांच्या कठीण परिस्थितीबद्दल बोललो आहे की ते वर्षभर किती आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करतात. म्हणून, भारतातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः अनेक गावांमध्ये गायी त्यांचे घर चालवण्याचे साधन आहेत. आजकाल खेड्यांमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे आपल्याला त्यांचे घर आणि त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती पाहून कळते. म्हणून उन्हाळ्यात प्रामुख्याने आपल्या परिसरात त्यांना पाणी आणि चारा पुरवण्यासाठी तजवीज करणे महत्वाचे आहे. अशाप्रकारे आपण आपल्या गायींना मदत करू शकतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला जंगलातील प्राण्यांचा विचार करावा लागेल कारण त्यांना उन्हाळ्यात खूप त्रास सहन करावा लागतो कारण त्यांना जंगलात पाणी मिळत नाही, म्हणून त्यांना कठीण काळात पाणी कसे पुरवायचे आणि निश्चितच अन्न कसे पुरवायचे हे समजून घेणे महत्वाचे आहे कारण शेवटी सर्व पाळीव प्राणी आणि वन्य प्राणी आपल्यासाठी महत्वाचे आहेत ते निसर्गाचे संतुलन राखतात आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्याला बरेच काही मिळते आणि त्यामुळे फायदे देखील मिळतात.