काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी जेव्हा मोर्चा घेऊन आले होते तेव्हा, त्यांना अडवण्यासाठी भले मोठे खिळे संपूर्ण रस्ता भर पसरविण्यात आले होते; ज्या कुणी ही युक्ती लढवली होती, त्याला कदाचित जमिनीवरची शेतकर्यांची प्रत्यक्ष परिस्थिती माहित नसावी, सम्पूर्ण देशातच मग ते कोणत्याही राज्या बद्दल आम्ही इथे बोललो तर त्यात काही चूक नसेल, उत्तर भारतात आपन जर गेलो तर, आपल्याला शेतकऱ्यांचे होणारे भयंकर हाल अनुभवायला मिळेल, स्वातंत्र्य मिळवून आम्हाला इतके वर्षे लोटली, मात्र समाजातील एक वर्ग, तेव्हा पासून आतापर्यंत उपेक्षित राहिला आणि तो म्हणजे शेतकरी. शेतकरी हा शेतकरी आहे, तो मराठी असो, हिंदी असो, गुजराती असो, बंगाली असो, उत्तर भारतीय असो किंवा पंजाबी असो यांच्या अवस्था वाईट आहेत देशात. आम्ही शहरात राहतो, दररोज आम्हाला रंगा रंगाच्या चड्ड्या घालायला मिळतात. ताटात दररोज वेगवेगळे अन्न असत. पायात घालायला वेगवेगळ्या चपला आणि जोडे असतात. एक वेळ वाटेल तर दिवसातून आम्ही दहा वेळा चरु शकतो. आपन कित्येक जण नशिबवान आहोत. कारण, आपल्या आजूबाजूला अपेक्षित बदल आणि सुधरना झालेल्या आहेत. आपल्या आई बापाला नोकर्या पाणी, कसे बसे शहरात आल्यानंतर मिळून जातात, नाहीतर दुकाने वगैरे थाटली तर ती ही चालतात. शहरातली परिस्थिती वेगळी असते आणि देशातील अनेको खेड्यांतील परिस्थिती वेगळी असते. शहरातील शाळांमध्ये सुंदर वातावरण असत, मूलं खांद्याला खांदा लाऊन सोबत शिकतात, जेवतात, खेळतात आणि मोठे होतात आणि त्यांच्यात भेदभावाची भावना नसते, ही मुलं वेगळी असतात. वेगळया वातावरणात आणि वेगळया जगात वाढलेली असतात आणि देशातील अनेको खेडे गांवात, परिस्थिती ही वेगळी असते. खेडे गांवात राहणार्या लोकांचा कित्येकदा मुख्य व्यवसाय हा शेती असतो किंवा दूध विकण्याचा, किंवा मोलमजुरी करून जगण्याचा, भाजी पाला विकण्याचा, किंवा गुरे राखण्याचा किंवा मग चपला जोडे शिवण्याचा किंवा छोटी मोठी आपली दुकाने थाटून ते जगत असतात. मात्र, त्यांना अपेक्षा असते त्यांच्या जीवनात बदल आणखी चांगले होण्याची, शेतकरी तर वर्षभर ही आमच्या कडे मार खात असतो, त्यांना मात्र वर्षभर ही अनेक आव्हानांना आणि समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यांच्या समस्या मात्र तरीही सुटतांना दिसत नाही ही सत्य परिस्थिती आहे .