सुसंवाद धोरणाच्या मध्यावधी आढाव्याचा भाग म्हणून,इटलीने युरोपकडून एक अत्यंत महत्त्वपूर्ण परिणाम मागितला आणि मिळवला आहे: यामध्ये ७ अब्ज युरोंहून अधिक निधीची उभारणी करण्यात आली आहे ज्यामुळे इटालियन व्यवसायांची स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होईल;
त्याचबरोबर त्यातून आपल्या जनतेसाठी परवडणारी घरे , पाणी आणि ऊर्जा क्षेत्रासाठी यातून काही भाग हा वाटप केला जाईल अशी माहिती इटलीचा पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी इटालियन जनतेला दिली .
. या दरम्यान त्या म्हणाल्या कि , युरोपियन संसाधनांचा अधिक प्रभावीपणे आणि ठोस वापर सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अधिकाधिक लवचितेला आणि सुलभीकरणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे .
त्याच बरोबर, त्या पुढे म्हणाल्या कि यरोपियन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राफेल फिटो यांनी पुरस्कृत केलेल्या सुसंवाद धोरणांच्या सुधारणेद्वारे हे उद्दिष्ट पुढे साध्य केले जाणार आहे .
आमच्या सरकारने सुरवातीपासूनच राष्ट्राचा विकासाला आणि वाढीला पाठिंबा देण्यासाठी युरोपियन संसाधनांचा योग्य वापर करण्याचा आणि ते संसाधने बसविणे आम्ही समोर सुद्धा चालू ठेवले असं त्या या दरम्यान म्हणाल्या







