भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील जे सर्वोत्कृष्ट संविधान भारताला दिले, त्याला आता ७५ वर्ष पूर्ण होत आहेत.त्यानिमित्त संविधानाचा अमृत महोत्सव महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यात २०२४-२५ या काळात साजरा केला जाणार आहे.
याचा शासन आदेश सुद्धा जारी करण्यात आला आहे. यानिमित्ताने ‘घर घर संविधान’ या अभियानाची आखणी करण्यात आली असून अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संविधानाबाबत जागरूकता, शिक्षण, त्यातून मूल्य संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वांचा सक्रिय सहभाग यातून साध्य केला जाणार आहे.
या ‘घर घर संविधान’ उपक्रमात सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे आणि संविधानाचा जागर करावा असं राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या फेसबुक हॅन्डल वरून राज्यातील सर्व जनतेला संबोधून म्हंटल .