पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला सगळीकडे हिरवगार गवत वाढताना दिसते. मात्र, जसा जसा पावसाळा संपत जातो त्यानंतर हळूहळू हे हिरवगार गवत सुद्धा कमी होत जात आणि गुरांना शहरामध्ये, गावांमध्ये आणि अनेक ठिकाणी चाऱ्याच्या समस्या पावसाळ्यानंतर हळूहळू जसे दिवस पालटत जातात तस तशी जाणवायला लागते. चाऱ्याची समस्या आम्हाला कित्येकदा अनेक क्षेत्रात बघायला मिळते, त्यामुळे गुरांची आणि कित्येक प्राण्यांची जे हिरव्या वनस्पतींवर आणि हिरव्यागार गवतावर अवलंबून असतात त्या प्राण्यांची परिस्थीती बिकट होतांना आपल्याला दिसते, पावसाळ्यानंतर, हिवाळा आणि हिवाळ्या नंतर उन्हाळा तर ह्या दरम्यान आम्हाला बघायला मिळत की हिरवा चारा हळूहळू कमी होत जातोय आणि गुरे अक्षरशः हिरव्या चाऱ्यासाठी गावात भटकतांना दिसतात. मात्र, त्यांना शोधूनही आणि गावात भटकून सुद्धा हिरवा चारा मिळत नाही आणि कित्येकदा त्यांना मग आम्ही लोकांनी फेकून दिलेला कचरा, कागदं, प्लास्टिक च्या पिशव्या खाव्या लागतात; आणि ते आम्हाला ह्या गोष्टी खाताना आढळतात आणि हे आज सगळीकडे सहज बघायला मिळते आणि ही परिस्थिती शहरीकरणामुळे शहरांत गंभीर झाली आहे. तर, आपल्याला महिती आहे की पावसाळय़ात आपल्याकडे बर्यापैकी पाऊस पडतो आणि त्या मुळे सगळी कडे हिरवगार असा परिसर आपल्याला बघायला आणि अनुभवण्यास मिळतो, जे हिरवगार गवत हळूहळू तसच वाळून पुढे ते वाया जाते, तर हिरवगार गवत वाळायच्या आधी शेतकर्यांनी आणि ज्यांच्याकडे गाई, म्हशी असतात त्या लोकांनी पावसाळ्यानंतर थोड थोड गवत कापून ते बर्यापैकी जमा किंवा गोळा करून ठेवले तर, हेच गवत पुढे कडक उन्हाळ्याच्या दिवसांत जरी ते वाळलेल असल, तरी ते उन्हाळ्या च्या दिवसांत गुरांच्या खूप उपयोगी पडू शकते, त्यांना त्यामुळे चाऱ्यासाठी उन्हात भटकायची गरज पडणार नाही आणि चारा मिळाल्यामुळे त्यांची परिस्थिती वाईट होणार नाही, ना ते दगावतील. तर अश्या प्रकारे आम्ही आमच्या गुरांचा जीव वाचवू शकु. उन्हाळ्याच्या दिवसांत फक्त विदर्भच नाही तर, महाराष्ट्रातील अनेक भागात भीषण परिस्थिती अनुभवायला मिळते, त्यामुळे माणसांचेच नाही तर गुरांचे हाल खराब होतात आणि चाऱ्याच्या अभावामुळे त्यांचा मृत्यू होताना दिसते. याला कित्येकदा आपणच कारणीभूत असतो. कारण, चारा नसेल तर उन्हाळ्यात गुरांना सुद्धा वणवण भटकाव लागत आणि त्यांच्या मालकांना सुद्धा.